Sunday 10 March 2019

मराठी भाषा दिवस

२७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस
मराठी भाषा दिवस - [Marathi Bhasha Diwas] जागतिक मराठी भाषा दिवस / मराठी भाषा दिन / मराठी भाषा गौरव दिन. २७ फेब्रुवारी हा दिवस मराठी साहित्याचा मानदंड वि.वा.शिरवाडकर यांचा जन्मदिवस, हा दिवस ‘मराठी भाषा दिवस’ म्हणून साजरा केला जातो.

कुसुमाग्रज: (२७ फेब्रुवारी १९१२ ते १० मार्च १९९९) पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी नाटककार व कादंबरीकार. कुसुमाग्रज या नावाने काव्यलेखन. जन्म पुणे येथील. जीवनलहरी, किनारा, मराठी माती, वादळवेल इत्यादी त्याचे प्रकाशित काव्यसंग्रह, विशाखा हा काव्यसंग्रह आधुनिक मराठी काव्याचे एक कायमचे भूषण आहे. दुसरा पेशवा, वीज म्हणाली धरतीला, नटसम्राट, राजमुकुट इत्यादी गाजलेली नाटके. १९७४ मध्ये नटसम्राट ह्या नाटकाला साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले. वैष्णव, जान्हवी, कल्पनेच्या तीरावर ह्या कादंबर्‍या. १९६४ मधील गोव्याच्या साहित्य समेलनाचे ते अध्यक्ष होते.

No comments:

Post a Comment